शिवदिनविशेष 10/03

शिव दिनविशेष

१० मार्च इ.स.१६४९
स्वराज्य संकल्पक थोरले महाराज साहेब "शहाजीराजे" यांना कैद करून आदीलशाही सरदार "अफझलखान" विजापूर मध्ये आला.
यावेळी "किल्ले जिंजी" ची अपार लूट एकूण ८६ हत्तींवर लादून त्याने विजापूरात नेली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१० मार्च इ.स.१६५९
छत्रपती शिवाजी महाराज जामखेढचा खर्डा किल्ला (शिवपट्टन) ला निघाले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१० मार्च इ.स.१६७३
किल्ले रायगडहून किल्ले पन्हाळगडाकडे जाताना वाटेत छत्रपती शिवरायांचा किल्ले प्रतापगडवर मुक्काम.
प्रतापगडावर भवानी देवीची महाराजांकडून पूजा.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१० मार्च इ.स.१६७७
५ फेब्रुवारी १६७७ ते १० मार्च १६७७ या कालावधीमध्ये हैदराबाद येथील भागानगर मधील मुक्काम आटोपून छत्रपती शिवरायांचे दक्षिण दिग्विजयसाठी दक्षिणेकडे प्रस्थान.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१० मार्च इ.स.१६७९
छत्रपती शिवरायांचे सरदार "थोरले आनंदराव" यांनी विजापूरच्या आदीलशहाकडून "बाळापूर" जिंकले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१० मार्च इ.स.१७००
छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) यांचे किल्ले विशाळगडावर मंचकारोहण झाले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१० मार्च इ.स.१७०४
औरंगजेबने स्वताच्या ८९व्या वाढदिवशी कानंद खोरे मधील "किल्ले तोरणा" उर्फ "प्रचंडगड" जिंकला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
            जय गडकोट
        !! हर हर महादेव !!
🚩 ⛳⛳मराठा⛳⛳🚩

Comments

Popular posts from this blog

शंभू चरित्र भाग २१

शिवदिनविशेष 13/03